समकालीन कलाकृतींची मेजवानी
समकालीन कलाकृतींची मेजवानी
सहयोग आर्ट फाउंडेशनचे प्रदर्शन १७ डिसेंबरपासून
मुंबई, ता. १५ : सहयोग आर्ट फाउंडेशनतर्फे १७ ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान नववे समकालीन कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले आहे. मुंबईतील ब्रिच कँडी येथील सिमरोझा आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन पार पडणार आहे. देशभरातील १६ ते ७८ वयोगटातील कलाकारांना हे प्रदर्शन एकत्र आणणार आहे.
ज्येष्ठ कलाकार सत्येंद्र राणे यांच्या आयोजन व नेतृत्वाखाली आणि १६ वर्षीय आलिया ठक्कर हिच्या सह-नेतृत्वामध्ये हे प्रदर्शन सादर होत आहे. या प्रदर्शनात ३० कलाकारांच्या ७० हून अधिक कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. बंगळूर, उडुपी, नाशिक, पुणे, मुंबई, ग्वाल्हेर तसेच देशातील इतर अनेक शहरांमधील कलाकार यात सहभागी झाले आहेत.
यंदाच्या प्रदर्शनात विविध कला प्रकार आणि माध्यमांचा समावेश आहे. प्रथमच छायाचित्रांचा समावेश करण्यात आला असून, शिल्पकला तसेच वॉटरकलर, ऑइल, मिक्स्ड मीडिया आणि अॅब्स्ट्रॅक्ट शैलीतील चित्रे मांडली जाणार आहेत.
हे कलाकार होणार सहभागी
सहभागी कलाकारांमध्ये आलिया ठक्कर, अनुपमा मांडवकर, भारती ढवळे, दीपा हेक्रे, फिरोज इनामदार, कमल अहमद, मुकुंद केतकर, मधुमिता बासू, नंदिता देसाई, नितीन कुलकर्णी, प्रशांत जाधव, प्रशांत प्रभू, पेहेल बिरावत, रेना हजारी, रिया नाडर, रंजन पटेल, रेवती शिवकुमार, स्नेहा निकम, सत्येंद्र राणे, स्मिता राणे, सिमरन सेहगल, सुहास मांजरेकर, विभा शर्मा, सतीश तायडे, शैलजा कामत, शिरेश आर. कराळे, सुजाता मोहीडेकर, श्रीकांत कदम, सब लेफ्टनंट पार्थ सी. महाजन आणि झाकीर हुसेन तन्हा यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

