२०० दिव्यांगांना मिळणार ''नवी उमेद''

२०० दिव्यांगांना मिळणार ''नवी उमेद''

Published on

२०० दिव्यांगांना मिळणार ‘नवी उमेद’
अत्याधुनिक कृत्रिम पाय मोफत बसवणार!
ठाणे, ता. १६ (बातमीदार) : शारीरिक अपंगत्वामुळे दैनंदिन जीवनात संघर्षाचा सामना करणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी डोंबिवलीत एका विशेष सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारत विकास परिषद’ आणि ‘चंद्रकांत नारायण पाटकर ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने २०० दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत बसवले जाणार आहेत. यासाठी रविवार, १८ जानेवारी रोजी चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली (पूर्व) येथे मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ई कृत्रिम पाय बसवण्यासाठी तज्ज्ञांमार्फत मोजमाप घेतले जाईल. त्यासाठी डोंबिवली, कल्याण आणि ठाणे परिसरातील दिव्यांगांनी खालील क्रमांकावर पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे.

शिबिरात दिले जाणारे कृत्रिम अवयव तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत. या पायाची बाजारपेठेत किंमत ५० हजार रुपयांहून अधिक आहे, मात्र येथे ते पूर्णपणे मोफत दिले जातील. हे पाय ऑटो-फोल्डिंग आणि वजनाला हलके असून, वापरकर्त्याला सामान्य माणसासारखे चालणे सहज शक्य होते. २० ते ५० वयोगटातील व्यक्ती या पायांच्या मदतीने सर्व कामे करू शकतात. कृत्रिम हाताने सहा किलोपर्यंत वजन उचलणे आणि ३६० अंश फिरवणे शक्य आहे. या उत्पादनांना एआरएआय प्रमाणपत्र प्राप्त आहे.

सेवाभावी कार्याचा वारसा
भारत विकास परिषदेचे विश्वस्त विलय खटावकर यांनी माहिती दिली की, ‘‘आम्ही दिव्यांगांमध्ये देव पाहतो. ही सेवा नसून आमचे कर्तव्य आहे.’’ परिषदेच्या पुणे केंद्राने गेल्या २५ वर्षांत २५ हजारहून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप केले आहे. एप्रिल २०२५ मध्ये एकाच शिबिरात ८९२ जणांना पाय बसवून या संस्थेने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव नोंदवले आहे.

अपंगत्वाची प्रमुख कारणे
संस्थेच्या निरीक्षणानुसार, हात किंवा पाय गमावण्यामागे खालील प्रमुख कारणे आढळतात
मधुमेह आणि गँगरीन : ५० %
रस्ते अपघात व इतर : ३० %
स्थानिक अपघात : २० %

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com