चार वर्षांपासून चारोटी बाग अपूर्ण अवस्थेत;

चार वर्षांपासून चारोटी बाग अपूर्ण अवस्थेत;

Published on

चार वर्षांपासून चारोटी बाग बंद अवस्थेत
कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया ः झाडे वाळली, गैरसामाजिक तत्त्वांचा वावर वाढला
कासा, ता. १६ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथे आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत उभारलेली चारोटी बाग गेली चार वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. बागेचे बहुतांश काम पूर्ण झाले असतानाही ती अद्याप पर्यटकांसाठी खुली करण्यात आलेली नाही. कोरोना काळानंतरही बाग सुरू न झाल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी व कुटुंबियांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, बाग तातडीने खुली करण्याची मागणी होत आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चारोटी गाव हे मुंबईच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी दत्तक घेतले होते. त्याअंतर्गत गावात पाणीपुरवठा, वीज व रस्ते आदी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. खासदार निधीतून चारोटी नाका येथे तीन एकर जमिनीवर कोट्यवधी खर्चून बाग उभारण्यात आली. या बागेत वारली चित्रकला, मुलांसाठी खेळणी, व्यायामाची साधने आणि विविध फुलझाडे व वृक्षलागवड करण्यात आली होती. मात्र, सध्या बागेतील झाडे सुकली असून कंपाउंड तुटलेले आहेत. गवत व झुडपे वाढल्याने संपूर्ण परिसर ओसाड व भकास झाला आहे. तर, गेल्या काही दिवसांपासून या बागेत काही गर्दुले आणि असामाजिक घटकांचा वावर वाढला असून गैरवापर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत उपवनसंरक्षक वनविभागाचे डहाणू अधिकारी दिवाकर निरंजन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.

चारोटी आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत निर्माण केलेली ही बाग सध्या पूर्णपणे ओसाड झाली आहे. झाडे सुकली असून गर्दुल्यांचा वावर सुरू आहे. भविष्यात अघटीत घटना घडू शकतात. प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून बागेची देखभाल करावी व ती पर्यटकांसाठी खुली करावी.
- प्रणय मेहरा, उपसरपंच, चारोटी ग्रामपंचायत

चारोटी येथील बाग पर्यटकांसाठी सुरू होणे गरजेचे आहे. मात्र, ती बंद असल्याने आता डागडुजी, पाणीपुरवठा, वीज व नियमित देखभाल यासाठी नियोजन करावे लागेल. यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- सुजय कोळी, वनविभाग अधिकारी, कासा
फोटो....२.. प्रणय मेहेर उपसरपंच चारोटी. ...दाढी वाले.
३. सुजित कोळी.. वनविभाग अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com