खंडाळा घाटात बाईक रायडर्सचा धिंगाणा
खंडाळा घाटात बाइक रायडर्सचा धिंगाणा
नियम धाब्यावर बसवत जीवघेणे स्टंट; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
खालापूर, ता. १६ (बातमीदार) : शनिवार-रविवार जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर, विशेषतः खंडाळा व लोणावळा घाट परिसरात बाइक रायडर्सकडून सुरू असलेले जीवघेणे स्टंट सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करत आहेत. वेगाची नशा आणि महागड्या बाइकचा माज दाखवत काही तरुण खुलेआम नियम धाब्यावर बसवून स्टंट करत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हृदयाचे ठोके वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सुट्टीच्या दिवसांत मुंबई, नवी मुंबई परिसरातून शेकडो बाइक रायडर्स खंडाळा व लोणावळा घाटात दाखल होतात. खोपोली बाह्य मार्गावर व घाटातील वळणदार रस्त्यांवर हे रायडर्स थांबून रहदारीने व्यग्र असलेल्या महामार्गावरच धोकादायक स्टंट करतात. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या वाहनांची तमा न बाळगता एका चाकावर बाइक चालवणे, अचानक वेग वाढवणे, ओव्हरटेक करताना नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. या स्टंटबाजीच्या स्पर्धेत नवखे आणि अनुभवहीन रायडर्सही सहभागी होत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. बदललेल्या सायलेन्सरमधून येणारा धडकी भरणारा आवाज आणि अचानक समोर येणारी वेगवान बाइक पाहून प्रवासी, कुटुंबीय व महिला प्रवासी भयभीत होत आहेत. काही ठिकाणी या प्रकारांमुळे अपघातही घडले असून, त्यात रायडर्ससह इतर प्रवासी जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
................
राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या या धिंगाण्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे घाट परिसरात विशेष गस्त, सीसीटीव्ही निरीक्षण, दंडात्मक कारवाई व बाईक जप्ती यांसारख्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिक आणि नियमित प्रवाशांकडून केली जात आहे. आम्ही या मार्गावरून नियमित प्रवास करतो. सध्या बाइक रायडर्स ज्या पद्धतीने सुसाट वेगाने आणि स्टंट करत बाइक चालवतात; त्यामुळे अपघात घडत आहेत. यात रायडर्ससह निरपराध प्रवासीही जखमी होत आहेत, असे स्थानिक रहिवासी दत्ता शेडगे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

