मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेची ५८ वी वार्षिक सभा संपन्न, नेतृत्वावर पुन्हा विश्वास, कामगारहिताच्या निर्णयांना गती
अध्यक्षपदी बाबा कदम यांची पुनर्नियुक्ती
मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेच्या वार्षिक सभेत विविध निर्णय
मुलुंड, ता. १६ (बातमीदार) ः मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेना या संघटनेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभादेवी येथील हिंदवीर सेवा संघ येथे नुकतीच पार पडली. २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली असून, अध्यक्षपदी बाबा कदम, सरचिटणीसपदी किशोरी पेडणेकर आणि कार्याध्यक्षपदी प्रशांत तळेकर यांची सर्वानुमते पुनर्निवड करण्यात आली.
सभेत २०२४ व २०२५ या कालावधीत संघटनेने केलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा मांडण्यात आला. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुंबई अग्निशमन दलातील ५३ दुय्यम अधिकारी पदे भरण्यात यश आले असल्याचे सांगण्यात आले. प्रमुख अग्निशामक पदोन्नतीसाठी आवश्यक प्रशिक्षण सेवेत आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
दुर्घटनास्थळी धाडसाने व कौशल्याने काम करणाऱ्या जवानांना आयुक्तांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या रजत पदकाच्या मानधनात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. कर्तव्य बजावत असताना मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास देण्यात येणारी नुकसानभरपाई एक कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव संघटनेच्या मागणीनुसार अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली.
भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांची उंची १७२ से.मी.वरून १६५ ते १६८ से.मी.पर्यंत आणि महिला उमेदवारांची उंची १६२ से.मी.वरून १५७ से.मी.पर्यंत कमी करण्याबाबत तसेच भरतीपूर्व लेखी परीक्षा घेण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. कार्यशाळांतील कंत्राटीकरणास संघटनेने पत्राद्वारे तीव्र विरोध नोंदविला आहे.
या वेळी अध्यक्ष बाबा कदम यांनी इतर संघटनांकडून श्रेय घेण्याच्या प्रयत्नांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले. सभासदांनी संघटनेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले. सभेला सर्व पदाधिकारी, सदस्य, केंद्र प्रतिनिधी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

