‘स्वच्छ पालघर’चा ध्यास
‘स्वच्छ पालघर’चा ध्यास
जिल्ह्यात घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाला गती
पालघर, ता. १६ ः जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल उचललेले आहे. याच अनुषंगाने पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी कोट्यवधीच्या निधीची तरतूद केली आहे.
पालघर जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५३ गावांसाठी गावांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्याकरिता स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घनकचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी गावस्तरावर कचरा विलगीकरण केंद्र, कचरा साठवण शेड, कंपोस्ट पिट, नाडेप, गांडुळ खत प्रक्रिया, सार्वजनिक कचराकुंडी, घंटागाडी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सांडपाण्याचे योग्यरीत्या व्यवस्थापनासाठी गावस्तरावर परसबाग, पाझर खड्डा, शोष खड्डा, स्थिरीकरण तळे तसेच ५००० जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये आवश्यकतेनुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्र, फायटोरिड तंत्रज्ञान, विनॉक्सिवीकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया, विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया टायगर बायो फिल्टर यासारखे तंत्रज्ञान घेण्यात आले आहे.
------------------------------
निधीची तरतूद
- घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाकरिता पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांना प्रति व्यक्ती ३४० रुपये, पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना प्रति व्यक्ती ७०५ रुपयांप्रमाणे निधी मिळणार आहे.
- जिल्ह्यातील ५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ८४५ गावांपैकी ८३८ गावांमध्ये तर ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५३ गावांपैकी आठ गावांमध्ये घनकचरा सांडपाणी व्यवथापनाची कामे पूर्ण झाले असून, उर्वरित ५२ गावांमध्ये कामे सुरू आहेत.
-------------------------
दुसऱ्या टप्प्यात ८९८ गावे
- दुसऱ्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातील ८९८ गावांचा समावेश करण्यात आला असून, सर्व गावांमध्ये योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये ७० टक्के निधी हा स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत, तर ३० टक्के निधी पंधरा वित्त आयोगाचा आहे.
- नऊ गावांमध्ये व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागेची अडचण असून, क्लस्टर योजना राबवून एकत्रित कचरा संकलन केले जाणार आहे. त्यासाठी सरकारी जमीन घेण्यात येणार असून, त्याचा प्रस्तावही मंजूर आहे.
-------------------------------
गावस्तरावरच्या शाश्वत स्वच्छतेसाठी घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी जनतेचा सहभाग अवश्यक आहे. आरोग्यदायी आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.
- अतुल पारस्कर, प्रकल्प संचालक, स्वच्छ भारत मिशन
----------------------
व्यवस्थापनाची माहिती
पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या - ५३ गावे
प्रकल्पाची किंमत : किमान १० लाख कमाल १ कोटी
------------------------------
१० गावांची कामे पूर्ण
२०२४ : २१ गावांचा आराखडा पूर्ण
२०२४ : २१ कामांचे आदेश झाले
२०२५ : २२ कामंची निविदा प्रक्रिया
----------------------------
तालुका निवडलेली गावे
विक्रमगड : २
वसई : ४
पालघर : २०
वाडा : १
मोखाडा : १
डहाणू : १४
तलासरी : ११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

