मुंबई
दोन पिस्टल आणि ७ जीवंत कडतुसासह केली अटक
दोन पिस्टल, काडतुसासह दोघे अटकेत
ठाणे, ता. १६ : नवी मुंबई, कामोठे पोलिस ठाण्यातील चोरीच्या दुचाकीवरून आलेल्या नवी मुंबईतील वसीउल्लाह किताबुल्ला चौधरी (वय ४५) आणि हिमांशू राजू वर्मा (२४) यांना वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी, दोन अग्निशस्त्र, सात जिवंत काडतुसे असा एक लाख ५२ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन जण चोरीची दुचाकी घेऊन भिवंडी, राजणोली नाका येथे येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट युनिट पाच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश गावीत यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. १४) सापळा लावून त्या दोघांना अटक केली.

