शेंगदाण्यांच्या कंटेनरला आग

शेंगदाण्यांच्या कंटेनरला आग

Published on

शेंगदाण्याच्या कंटेनरला आग
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्घटना
कासा, ता. १७ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरीतील तपासणी नाक्यावर शेंगदाण्याने भरलेल्या कंटेनरला अचानक आग लागली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही; पण कंटेनरची केबिन जळली आहे.
दापचरी नाक्यावर कंटेनरमधील शेंगदाण्याच्या गोण्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग लागली होती. या वेळी गुजरात, डहाणू येथून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. दोन्ही दलांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली; पण केबिन पूर्णपणे जळली आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनाचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारणही अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
------------------------
विलंबामुळे नुकसान
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत; पण महामार्ग प्राधिकरण, प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. महामार्गावर सुविधा नसल्याने पालघर, बोईसर, डहाणू, गुजरातमधील उंबरगाव-सरीगाव येथून मदत घ्यावी लागते. त्यामुळे किमान प्रत्येक टोलनाक्यावर किंवा संवेदनशील ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी तैनात करावी, अशी मागणी होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com