टेडएक्स रामबाग कडून भायखळा प्राणीसंग्रहालयात अनोखा जैवविविधता अनुभव

टेडएक्स रामबाग कडून भायखळा प्राणीसंग्रहालयात अनोखा जैवविविधता अनुभव

Published on

टेडएक्स रामबागचा भायखळा प्राणीसंग्रहालयात अनोखा उपक्रम
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : कल्याणमधील टेडएक्स रामबाग कंपनीच्या वतीने नुकताच भायखळा येथील प्राणीसंग्रहालयात एक विशेष साहसी उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमात स्वयंसेवक, वक्ते, प्रभावक आणि समाजातील विविध घटकांनी उत्साहाने सहभाग घेतला. वन्यजीवन, पर्यावरण संवर्धन आणि परिसंस्थेचा समतोल याविषयी प्रत्यक्ष अनुभव दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या उपक्रमादरम्यान सहभागी सदस्यांनी विविध प्राण्यांचे अधिवास जवळून पाहिले, जैवविविधतेचे महत्त्व समजून घेतले. या उपक्रमाचे नेतृत्व टेडएक्स रामबागचे आयोजक शुभम मिंदे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षा, अश्विन, आदित्य, कस्तुरी आणि चिन्मय या सदस्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी झेड फाउंडेशनचे तुषार आणि त्यांच्या संपूर्ण संघाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Marathi News Esakal
www.esakal.com