अतिक्रमणाविरोधात नागरिकांचा एल्गार
अतिक्रमणाविरोधात नागरिकांचा एल्गार
रस्ते मोकळे करण्यासाठी कळवावासीयांचे निवेदन
कळवा, ता. १७ (बातमीदार) ः हप्ता वसुली करणारे गुंड, बेकायदा फेरीवाले आणि पार्किंग माफियांनी कळवा पूर्वेतील रस्त्यांवर कब्जा केल्याने स्थानिक नागरिकांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर तयार झालेला रस्ता वाचवण्यासाठी घोलाईनगर परिसरातील रहिवासी एकत्र आले असून, त्यांनी प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने लढा उभारला आहे.
कळवा पूर्व घोलाई मंदिर परिसरात मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. येथील नागरिकांनी पाठपुरावा करून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता मंजूर करून घेतला; मात्र रस्ता तयार होताच त्यावर भूमाफियांनी बेकायदा पार्किंग आणि फेरीवाल्यांना बसवून कब्जा केला आहे. विशेषतः बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे येथील परिस्थिती भयावह होते. स्थानिक गुंड आणि महापालिकेचे बोगस कर्मचारी विक्रेत्यांकडून अवैध वसुली करतात. तसेच वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने रुग्णवाहिका, स्कूल बस आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना जाण्यासाठी रस्ता उरत नाही. या वेळी गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी आणि भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. घोलाई देवी मंदिराच्या परिसरात भूमाफियांनी अनधिकृत बांधकामांचा सपाटा लावला असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
बाजार तात्पुरता बंद
नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे हा आठवडा बाजार सध्या दोन आठवड्यांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे; मात्र हा बाजार कायमस्वरूपी बंद करून तो कळवा पश्चिमेकडील मोठ्या रस्त्यावर स्थलांतरित करावा, अशी मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. तर हा रस्ता कळवा पश्चिमेला जाणारा आमचा एकमेव जीवनमार्ग आहे. बाजारामुळे हा मार्ग बंद होतो, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतो. हा बाजार त्वरित स्थलांतरित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश देसाई यांनी केली आहे.
प्रशासनाची भूमिका
हा आठवडा बाजार कायमस्वरूपी बंद करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रस्ता अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर लवकरच धडक कारवाई मोहीम हाती घेतली जाईल, अशी माहिती कळवा प्रभाग समिती, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

