नवी मुंबईत मनोरंजनाची बेगमी
नवी मुंबईत मनोरंजनाची बेगमी
शहरी, ग्रामीण संस्कृतीचा महोत्सवातून संगम
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : उत्तर कोकणातील आगरी, कोळी समाजाची संस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृतीचा जल्लोष असतो. स्मार्ट सिटीचा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई शहरात डिसेंबरमध्ये यानिमित्ताने मोठा उत्साह असतो. पारंपरिक खेळ, स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर विविध प्रादेशिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना शहरीबरोबर ग्रामीण संस्कृतीचा संगम अनुभवण्याची संधी मिळते.
नवी मुंबईत नेरूळ येथे पहिला आगरी-कोळी महोत्सव सुरू झाला. त्यानंतर गावागावात हा महोत्सव मोठ्या दिमाखात भरू लागला. थंडीची चाहूल लागताच मनोरंजनाचे केंद्र असलेले महोत्सव सुरू झाले. विशेष म्हणजे, या माध्यमातूनच इतर समाजाला आगरी-कोळी संस्कृती जवळून पाहता येते. समाजाचा इतिहास, परंपरा आणि लोकजीवनाचे प्रतिबिंब महोत्सवातून दिसते. खाद्यपदार्थ (सीफूड, स्थानिक पदार्थ), दागिने, वस्तू आणि इतर अनेक स्टॉल्स असतात. विविध लोककलांसाठीचे मोठे व्यासपीठ असते. सात ते आठ दिवस चालणाऱ्या महोत्सवात खाद्यसंस्कृतीपासून ते अगदी आगरी -कोळी समाजातील लोक कलेची ओळख घडली जाते. मातीच्या भांड्यांपासून कोळीगीते, लोकगीते, समूह नृत्यस्पर्धा, सोलोडान्स, विनोदी अदाकारी, सामूहिक नृत्य, आगरी-कोळ्यांच्या पद्धतीचा साखरपुडा, हळदी समांरभ, लोकनाट्यातून संस्कृतीचे दर्शन रंगमंचावर होते.
------------------------------
आकर्षणाचे केंद्र
- नवी मुंबई ऑयडॉल गीत गायन, वेशभूषा, लावणी, आंतरशालेय नृत्य, विविध गुणदर्शन, कोळी नृत्य, लावणी नृत्य, एकपात्री विनोदी नाट्य असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सवाची रंगत वाढवतात. या महोत्सवांमुळे अनेकांना रोजगार ही मिळाला जातो.
- विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू, दागिने, मसाले, लोणचे, खादीचे कपडे, महिल, तरुणीसाठी आकर्षक आभूषणांबरोबर बच्चेकंपनीसाठी आकाशपाळणे, विविध प्रकारच्या मनोरंजनपर खेळांमुळे परराज्यातील लोकदेखील आवर्जून अशा महोत्सवात उपस्थिती लावतात.
- लोककलाकारांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. तसेच विविध समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच आगरी-कोळी समाजाच्या ग्रामसंस्कृतीचा आकर्षक देखावा, संस्कृतीदर्शक चित्र प्रदर्शन, खाद्यसंस्कृती, सुक्या मासळीचा बाजार आकर्षण ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

