घरकुल लाभार्थी संवाद अभियान

घरकुल लाभार्थी संवाद अभियान

Published on

‘घरकुल’लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता
जिल्हा प्रशासन संवाद अभियान राबवणार
पालघर, ता. १७ (बातमीदार)ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यात घरकुल लाभार्थी संवाद अभियानाचा तिसरा टप्पा सर्व ग्रामपंचायतींमध्ये २३, २४ डिसेंबरला राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून घरकुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पालघर जिल्ह्यास ६० हजार ५७४ घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत १० हजार ४७८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे, पण १३ हजार ८६१ तसेच पंतप्रधान आवास अंतर्गत तीन हजार ३२२ असे १७ हजार १८३ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित होऊनही घरकुलांचे बांधकाम सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घरकुल लाभार्थी संवाद अभियान राबवण्यात येणार आहे.
-----------------------------
अभियानातील महत्त्वाचे टप्पे
- पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश कार्यक्रम याच कालावधीत येणार आहे. या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील १८ हजार ९७२, तिसऱ्या टप्प्यातील दोन हजार ९२३ अशी २१ हजार ८९५ घरकुलांचे वाटप होणार आहे.
- महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उमेद योजनेद्वारे पात्र महिला स्वयंसहाय्यता गटांना बँक कर्ज वितरण, बचत गटांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे, ‘लखपती दीदी’ संकल्पना, महिला उत्पादक संस्था स्थापन करण्यावर भर देण्यात येणार आहे.
--------------------------------
प्रत्यक्ष भेटीवर भर
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांनी विशेष नियोजन केले आहे. प्रथम हप्ता मिळूनही बांधकाम सुरू झाले नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांना १०० टक्के क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे प्रकल्प संचालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. रूपाली सातपुते यांनी सांगितले, तर सर्व लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुका, गाव स्तरावर अधिकारी-कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com