आचारसंहितेवरून तंबी

आचारसंहितेवरून तंबी

Published on

आचारसंहितेवरून तंबी
भंग केल्यास चार तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : सहा वर्षे रखडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने महापालिका प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास चार तासांमध्ये कारवाई होईल, असा इशारा राजकीय पक्षांना दिला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांसोबत संवाद साधला. राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुका घोषित केल्या आहेत. एमएमआर क्षेत्रात नवी मुंबई महापालिका सर्वात महत्त्वाची पालिका ओळखली जाते. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत सूचना देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. महापालिकेत पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या पाहता मतदारांना मतदान करण्यास अधिक वेळ लागू नये, याकरिता प्रशासनाने मतदान केंद्रांची संख्या वाढवून मतदारांची संख्या कमी केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केली.
---------------------------------------------
समाजमाध्यमांवर पोलिसांची नजर
निवडणुकीत घरोघरी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जाते. जेव्हा प्रचार थांबवला जातो, तेव्हासुद्धा सोशल मीडियावर खुलेआम प्रचार सुरू असतो. अशा सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर क्राइम पोलिसांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरील प्रसिद्धी माध्यमांना पाच दिवस आधी कोणते माहितीचे दृश्यफित ते चालवणार आहेत, त्याची मंजुरी निवडणूक अधिकाऱ्याकडून करून घेणे अनिवार्य असणार आहे, असे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले.
---------------------------------------------------
जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, याकरिता महापालिका विविध उपाययोजना राबवणार आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सी-व्हिजील प्रणाली कार्यान्वित आहे. या प्रणालीवर तक्रार आल्यास अवघ्या चार तासांमध्ये कारवाई होईल.
- डॉ. कैलास शिंदे. आयुक्त. नवी मुंबई महापालिका
-----------------------
मतदानाची रूपरेषा
- एकूण मतदारसंख्या - ९,४८,४६०
- एकूण पुरुष मतदार - ५,१६,२६७
- एकूण स्त्री मतदार - ४,३२,०४०
- इतर - १५३
- एकूण मतदान केंद्र - ११४१
- एकूण निवडणूक निर्णय अधिकारी - ८
------------------------
मतदानाचा कार्यक्रम
- २३ ते ३० तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार
- ३१ तारखेला अर्जांची छाननी
- २ तारखेला अर्ज मागे घेण्याची मुदत
- ३ तारखेला चिन्हवाटप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com