शिंदे गटाचा त्रिसूत्री निवडणूक लढवण्याचा निर्धार

शिंदे गटाचा त्रिसूत्री निवडणूक लढवण्याचा निर्धार

Published on

उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेने तयारीला वेग दिला आहे. संघटन बळकटीकरण, विकासाभिमुख धोरणे आणि थेट जनसंपर्क या त्रिसूत्रीवर निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात व ऐक्याच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांसाठीचा सविस्तर रोडमॅप निश्चित करण्यात आला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी संघटनात्मक कामांचा सखोल आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बूथस्तरावरील बळकटीकरण, प्रभागनिहाय स्थानिक प्रश्न, युवक व महिला घटकांचा सक्रिय सहभाग, तसेच घरोघर संपर्क मोहिमेवर विशेष भर देण्यात आला. नागरिकांचा विश्वास संपादन करणे हेच आगामी निवडणुकीतील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार महेश गायकवाड, राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंह भुल्लर, अरुण आशान, जया साधवानी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील रखडलेली विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न, तसेच नव्या प्रकल्पांसाठी आवश्यक पाठपुरावा यावर सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक विभागासाठी विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून आगामी आठवड्यांत व्यापक जनसंपर्क मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या शेवटी पदाधिकाऱ्यांनी विकासाभिमुख निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. एकजुटीच्या आणि लढाऊ घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.

जनतेचा विश्वास हेच बळ
उल्हासनगरचा विकास हा केवळ निवडणूक घोषणांपुरता मर्यादित विषय नाही. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, परिवहन आणि स्मार्ट प्रशासन या प्रत्येक क्षेत्रात शाश्वत बदल घडवण्यास शिवसेना कटिबद्ध आहे. कार्यकर्त्यांची एकजूट आणि जनतेचा विश्वास हेच आमचे बळ आहे, असे गोपाळ लांडगे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com