निवडणुकीसाठी ९  निवडणूक निर्णय अधिकारी तर २७ सहाय्यक निवडणूक  अधिकाऱ्याची नियुक्ती.....

निवडणुकीसाठी ९ निवडणूक निर्णय अधिकारी तर २७ सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती.....

Published on

निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
३१ पॅनलसाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या ३१ पॅनलच्या निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे नऊ अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी पदी नियुक्ती केली आहे.
पालिकेच्या ३१ पॅनलच्या निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे नऊ अधिकाऱ्याची आरओ (रिटरनिंग ऑफिसर) म्हणजेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर चार पॅनलची जबाबदारी असणार आहे. तर, तीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर तीन पॅनलची जबाबदारी असणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मदतीसाठी तीन सहाय्यक निवडणूक अधिकारी असे २७ अधिकारी असणार आहेत. या तीन अधिकाऱ्यांपैकी एक तहसीलदार, अप्पर तहसीलदार, नायब तहसीलदार, दर्जाचा अधिकारी तर उर्वरित दोन पालिकेतील सहाय्यक उपायुक्त आणि उप अभियंता दर्जाचे अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

१५००हून अधिक मतदान केंद्र
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पालिका क्षेत्रातील ३१ पॅनलमधून १२२ सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी पालिका क्षेत्रातील १५ लाख ५१ हजार ६०५ मतदार असून त्यानुसार अंदाजे साडे पंधराशेहून अधिक मतदान केंद्राची उभारणी केली जाणार आहे. या केंद्राची जबाबदारी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com