अंबरनाथमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम
अंबरनाथमध्ये निवडणुकीची रणधुमाळी
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; दिग्गजांच्या सभांनी वातावरण तापले
अंबरनाथ, ता. १८ (वार्ताहर) : अंबरनाथ विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघा एक दिवस शिल्लक असून, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी प्रचाराची अंतिम फेरी गाठली असून, गल्लीबोळात आणि वसाहतींमध्ये प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे.
सध्या अंबरनाथमध्ये पहाटेपासून पदयात्रा, दुपारच्या वेळी गाठीभेटी आणि संध्याकाळी कोपरा सभांचा धडाका सुरू आहे. उमेदवार स्वतः मतदारांच्या घराघरांत पोहोचून पाणीप्रश्न, रस्ते, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि युवकांचे प्रश्न या मुद्द्यांवर भर देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लागलेले बॅनर, झेंडे आणि घोषणांमुळे संपूर्ण परिसर राजकीय रंगात न्हाऊन निघाला आहे. डिजिटल माध्यमांचाही पुरेपूर वापर होत असून सोशल मीडियावर व्हिडिओ आणि लाइव्ह संवादाचा पाऊस पडत आहे. आता सर्वांचे लक्ष मतदानाच्या दिवसाकडे लागले असून, अंबरनाथचा ‘मतदार राजा’ कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतो आणि शहराच्या राजकीय भवितव्याचा फैसला कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दिग्गजांची उपस्थिती आणि जाहीर सभा
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
भाजप : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आणि खासदार रवी किशन यांचा रोड शो आयोजित केला होता.
शिवसेना (शिंदे गट) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेची शहरात मोठी चर्चा आहे.
प्रशासन सतर्क, मतदारांमध्ये उत्सुकता
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः संवेदनशील भागांत पोलिसांची करडी नजर आहे. दुसरीकडे, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ठिकठिकाणी पथनाट्यांद्वारे जनजागृती केली जात आहे. तर ‘यंदा बदल हवा’ आणि ‘विकासाला प्राधान्य देणाराच प्रतिनिधी हवा,’ अशा प्रतिक्रिया अंबरनाथच्या सुजाण मतदारांकडून उमटत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

