पेणमध्ये महानगर गॅसचे जाळे विस्तारले

पेणमध्ये महानगर गॅसचे जाळे विस्तारले

Published on

पेणमध्ये महानगर गॅसचे जाळे विस्तारले
४,५०० घरांमध्ये जोडणी पूर्ण; एलपीजी सिलिंडरच्या त्रासातून दिलासा
पेण, ता. १८ (वार्ताहर) : गेली अनेक वर्षे घरगुती वापरासाठी अवजड एलपीजी गॅस सिलिंडरवर अवलंबून असलेल्या रायगडकरांना आता मोठा दिलासा मिळत असून, महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून पाइपलाइनद्वारे घराघरांत गॅसपुरवठ्याचे जाळे वेगाने विस्तारत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पेण शहरातील सुमारे सहा हजार घरांपैकी तब्बल चार हजार ५०० घरांमध्ये महानगर गॅसची जोडणी पूर्ण झाली असून, शहरात गॅस पाइपलाइनचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे.
याबाबत १४ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महानगर गॅस कंपनीचे उपाध्यक्ष गुरविंदर सिंग यांनी सविस्तर माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील विविध भागांत महानगर गॅस लिमिटेडकडून घराघरांत पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठ्याचे काम सुरू असून, सध्या जिल्ह्यातील एक लाख दोन हजार ३८१ घरगुती ग्राहक या सेवेचा अविरतपणे लाभ घेत आहेत. सुरक्षित, सातत्यपूर्ण आणि सोयीस्कर गॅसपुरवठ्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले असल्याचेही त्यांनी सांगितले. सुरक्षितता, वेळेची बचत आणि पर्यावरणपूरक इंधन या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरत आहे. या पत्रकार परिषदेस कंपनीचे सहाय्यक प्रकल्प उपाध्यक्ष विवेक सोनार, ऑपरेशन्स व मेंटेनन्स उपाध्यक्ष सितांशु रॉय चौधरी, महाव्यवस्थापक प्रताप आयरेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
............
६८ सीएनजी स्थानकांची उभारणी
पेणसह रसायनी, खालापूर, खोपोली, उरण, माणगाव आणि अलिबाग या ठिकाणीही पाइपलाइन टाकण्याचे काम प्रगतिपथावर असून, हे संपूर्ण काम २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महानगर गॅसचे जाळे विस्तारत असताना जिल्ह्यात ६८ सीएनजी स्थानकांची उभारणीही करण्यात आली असून, या माध्यमातून ४८ औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना सेवा पुरवली जात आहे. महानगर गॅसमुळे सिलिंडर बदलण्याची कटकट, गॅस संपण्याची चिंता तसेच वाहतुकीतील अडचणी दूर झाल्याने घरगुती ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com