इच्छुक उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयात लगबग

इच्छुक उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयात लगबग

Published on

इच्छुक उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयात लगबग
पालिका निवडणूक रणधुमाळी; स्‍थानिकांच्या भेटीगाटी वाढल्या
वाशी, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तब्बल १० वर्षांनंतर होऊ घातलेल्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार पुन्हा एकदा मैदानात उतरले असून, शहरभर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयांत मोठी लगबग पाहायला मिळत आहे. प्रभागनिहाय हालचालींना वेग आला असून, नवी मुंबईत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या शेवटच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल २०१५ मध्ये पार पडल्या होत्या. त्यानंतर एप्रिल २०२० मध्ये निवडणुका अपेक्षित असताना विविध कारणांमुळे त्या होऊ शकल्या नाहीत. परिणामी २०२० पासून पालिकेवर प्रशासकांचे राज्य सुरू झाले. या काळात लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले, अशी नागरिकांची भावना आहे. दरम्यान, २०१९ पासूनच इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. प्रभागरचना व आरक्षणाची सोडतही जाहीर झाली होती; मात्र निवडणुका लांबणीवर पडल्याने अनेक इच्छुकांनी उघडलेली तात्पुरती जनसंपर्क कार्यालये बंद केली होती. कोरोनानंतर २०२२ मध्ये पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहू लागले होते. त्या वेळीही अनेकांनी तयारी सुरू केली; मात्र राज्यातील सत्तासंघर्ष आणि कायदेशीर अडचणींमुळे निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे मनोबल काहीसे खचले होते, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर अखेर १५ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नवचैतन्य संचारले असून, अनेकांनी बंद पडलेली जनसंपर्क कार्यालये पुन्हा सुरू केली आहेत, तर काही ठिकाणी नव्याने कार्यालये उघडण्यात आली आहेत. मतदारांशी थेट संवाद, भेटीगाठी, बैठका आणि संपर्क मोहिमा सुरू झाल्याने आगामी निवडणुकीची धामधूम नवी मुंबईत वाढत चालली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com