ममता मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनचा विक्रम
ममता मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनचा विक्रम
‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
कांदिवली, ता. १८ (बातमीदार) : मधुसूदन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रात ‘पेन-फ्री’ उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या फाउंडेशनने २४ तासांत सर्वाधिक गुडघा तपासणी करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्यात आली. हा विक्रम शुक्रवारी (ता. ५) जपानहून मुंबईत आलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या निर्णायक सोनिया उशिरोगोची यांनी अधिकृतपणे प्रमाणित केला.
ममता मधुसूदन अग्रवाल मेमोरियल फाउंडेशन, संजीवनी ममता हॉस्पिटल यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाशिम, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ यांसह १० पेक्षा अधिक जिल्ह्यांतील वंचित समुदायांतील ५१२ रुग्णांची स्क्रीनिंग करून कंबर आणि गुडघे तपासणी मोफत करण्यात आली होती.
कॅम्पमध्ये ज्यांना गुडघा किंवा कंबर प्रत्यारोपणाची गरज आहे अशा रुग्णांना मोबिलिटी व चालण्याचे परीक्षण, वैद्यकीय उपचार दिले गेले. सर्व सहभागी रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. तसेच ज्यांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च फाउंडेशन करते.
‘२१४ मोफत वैद्यकीय शिबिर’
फाउंडेशनतर्फे २१४ मोफत वैद्यकीय शिबिरे भरवण्यात आली. त्यात ३९,००० पेक्षा अधिक रुग्णांना मदत केली. वैद्यकीय उपक्रमांमध्ये ३०० पेक्षा अधिक सबसिडाइज्ड जॉइंट रिप्लेसमेंट, १५० कॅन्सर सर्जरी व केमोथेरपी, १,५०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया, १५० कृत्रिम अवयव, ५० ईएनटी शस्त्रक्रिया, ६.५०० डायलिसिस सत्रे आणि ५० बाल ऑर्थोपेडिक करेक्शन अशा सेवा दिल्या आहेत. या उपक्रमांमधून फाउंडेशनची समान, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याची बांधिलकी असल्याचे मधुसूदन अग्रवाल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

