अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी आणखी एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी आणखी एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Published on

अमली पदार्थ तस्करीप्रकरणी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
३५ किलो गांजासह आठ जणांना अटक; कल्याण पोलिसांची मोठी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ ः अमली पदार्थविक्री व तस्करीविरोधात परिमंडळ तीनअंतर्गत कल्याण पोलिसांनी आणखी एक मोठे यश मिळवले आहे. गांजा तस्करीप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाणे आणि कल्याण वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाने आंतरराज्यीय टोळीचा छडा लावत ३५ किलो गांजासह आठ आरोपींना मोक्काअंतर्गत अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी सहा आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बळीराम सिंग परदेशी आणि कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी छत्तीसगड येथील क्रमांकाची नोंदणी असलेली चारचाकी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. पाठलागादरम्यान आरोपींनी पोलिस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला; मात्र काही अंतरावर ही चारचाकी अडवण्यात पोलिसांना यश आले. या गाडीच्या तपासणीवेळी यामधून ३५ किलो गांजा आणि एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले, असे झेंडे यांनी सांगितले.
या चारचाकीमधून मोहम्मद सरफराज मोहम्मद आसिफ, मोहम्मद रफीक शेख, फैजान शेख, समीर अली आणि आसिफ सय्यद या पाच जणांना अटक करण्यात आली. या चौघांच्या चौकशी आणि अधिक तपासानंतर शाहीद अब्दुलगनी शेख (वय ३६), शाहीद शेख ऊर्फ बाबा ऊर्फ चाटू युनूस शेख (वय ३६) आणि रवींद्र मिर्धा (वय ३८) या अटक करण्यात आली. या आरोपींना सोमवारी (ता. १५) जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलिस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण कक्ष आणि कल्याण वाहतूक शाखेच्या पथकाने केली. याप्रकरणी अधिक तपास कल्याण घेटे करीत आहेत.

भिवंडी, नागपूर आणि ओडिशा येथून अटक
या आरोपींना भिवंडी, नागपूर आणि ओडिशा येथून अटक करण्यात आली आहे. ही टोळी नागपूर, अमरावती, भंडारा आणि ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करीसाठी सक्रिय होती. आरोपींवर नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एनडीपीएस कायद्यान्वये ४०हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहितीही देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com