दगड-मातीखाली दबलेले सीसीटीव्ही

दगड-मातीखाली दबलेले सीसीटीव्ही

Published on

दगड-मातीखाली दबले सीसीटीव्ही
बदलापूर पालिकेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह; वर्षभरातच सीसीटीव्हींची दुरवस्था
बदलापूर, ता. १८ (बातमीदार) ः बदलापूर नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा सध्या धूळखात पडून आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारावरील कॅमेऱ्यांवर बांधकामाच्या वेळी साचलेला दगड-मातीचा जाड थर जमा झाल्याने हे कॅमेरे पूर्णतः निकामी झाले आहेत. विशेष म्हणजे, केवळ प्रवेशद्वारच नव्हे तर संपूर्ण पालिका परिसरातील इतर सीसीटीव्हीदेखील बंद अवस्थेत असल्याचे समोर आल्याने इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२४ रोजी बदलापूर नगरपालिकेच्या इमारतीचे उद्‍घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. सुमारे ५०० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या पालिकेला आपल्या इमारतीतील सीसीटीव्हीची देखभाल करणे जमलेले नसल्याने नागरिकांकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे. उद्‍घाटन होऊन एक वर्ष पूर्ण होण्याआधीच सुरक्षा यंत्रणेची ही दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रशासकीय इमारतीत सीसीटीव्ही निष्क्रिय असणे ही गंभीर बाब असून, पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बंद पडलेले कॅमेरे दुरुस्त करावेत किंवा नव्याने सीसीटीव्ही बसवावेत, अशी जोरदार मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

नेमका प्रकार काय?
इमारतीच्या बांधकामाच्या वेळी ठेकेदाराने केलेल्या हलगर्जीमुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेरे माती आणि सिमेंटखाली दबले गेले आहेत. सीसीटीव्हीवर मातीचा जाड थर साचल्याने त्यातून काहीही दिसत नाही. परिणामी, पालिकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले असून, प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाची भूमिका
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता विजय पाटील यांनी सांगितले की, इमारतीचे बांधकाम करतेवेळी ठेकेदारकडून चुकून हे सीसीटीव्ही कॅमेरे मातीखाली दबले गेले आहेत. हा नादुरुस्त झालेला सीसीटीव्ही कॅमेरा व इतर सगळे कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त करून, सुस्थितीत करण्यात येतील, अशी माहिती बांधकाम विभागाचे अभियंता विजय पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com