नागरिकांचे राहणीमान उंचाविण्यासाठी प्रयत्न करणार

नागरिकांचे राहणीमान उंचाविण्यासाठी प्रयत्न करणार

Published on

ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास प्राधान्य देणार
नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचा संकल्प
(सकाळ वृत्तसेवा)
ठाणे, ता. १८ : ‘‘राज्य व केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी कटिबद्ध असेन,’’ अशी ग्वाही ठाणे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दिली. गुरुवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडून स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रणजित यादव यांनी प्रशासकीय कामात कार्यक्षमता, वेळबद्धता आणि पारदर्शकता आणण्याचा संकल्प व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विभागांत योग्य समन्वय साधून तंत्रज्ञानाधारित प्रशासन राबविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. ‘‘नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून घेऊन त्यावर तत्काळ सकारात्मक कार्यवाही केली जाईल,’’ असेही त्यांनी नमूद केले.

ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील रस्त्यांच्या समस्यांबाबत बोलताना यादव म्हणाले, ‘‘की मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गाव रस्ते सुसज्ज करण्याचा आमचा प्रयत्न असेल. विशेषतः पावसाळ्यात साकव (पूल) नसल्यामुळे रुग्णांना डोलीतून न्यावे लागते, हे चित्र बदलण्यासाठी गावोगावी प्राथमिक उपचार केंद्र सक्षम करण्यावर आणि रुग्णवाहिका तैनात ठेवण्यावर आमचा भर राहील.

प्रशासकीय अनुभवाची शिदोरी
रणजित यादव यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. गडचिरोली जिल्ह्याला राष्ट्रपतींकडून ‘उत्कृष्ट जिल्हा’ म्हणून गौरव मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आदिवासी कल्याणासाठी ‘पीएम जनमन’ आणि ‘धरती आबा अभियान’ यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केली आहे. सिंचन प्रकल्प आणि रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासोबतच ई-ऑफिस उपक्रम राबवण्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. या अनुभवाचा उपयोग आता ठाणे जिल्हा परिषदेच्या विकासाला नवी गती देण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com