अस्तित्वात नसलेल्या इमारतीत १४३ मतदार
अस्तित्वात नसलेल्या
इमारतीत १४३ मतदार
काँग्रेसचा गंभीर दावा; कोऱ्या ओळखपत्रांद्वारे ‘वोटचोरी’चा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान घडवून आणण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला आहे. बोरिवली येथील अस्तित्वात नसलेल्या इमारतीच्या पत्त्यावर तब्बल १४३ मतदारांची नोंद मतदार यादीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. तसेच नाव, पत्ता नसलेल्या कोऱ्या ओळखपत्रांद्वारे ‘वोटचोरी’चा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई काॅँग्रेसच्या महासचिव शीतल म्हात्रे यांनी सांगितले, की बोरिवली येथील आयसी कॉलनी, रोड क्रमांक पाच येथील एका कथित इमारतीत १४३ मतदार दाखवण्यात आले आहेत. प्रत्यक्ष पाहणीत अशी कोणतीही इमारत अस्तित्वात नसल्याचे काँग्रेसच्या पथकाच्या निदर्शनास आले आहे. जेथे इमारतच नाही, तेथे १४३ मतदार कसे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने अधिकृत हरकती नोंदवल्या होत्या आणि त्या दुरुस्त करण्याचे आश्वासनही निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते. अंतिम मतदार यादीत या त्रुटी कायम राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता निवडणूक आयोगाकडून ही नावे वगळता येणार नसल्याचे सांगण्यात येत असल्याने ही लोकशाहीची थट्टा असल्याचे शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.
‘मतदानाचा हक्क हा संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे. मुंबईकरांचे हक्क चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल,’ असा इशारा देत ‘नो वोट चोरी मेरी गली में’ हा मुंबईकरांचा सामूहिक संकल्प असावा, असे आवाहनही म्हात्रे यांनी केले.
............
अपूर्ण नावे अन् पत्ता!
वॉर्ड क्रमांक एकमध्ये १०० हून अधिक मतदारांची नावे अपूर्ण किंवा पत्त्याविना नोंदवण्यात आली आहेत. याशिवाय काही मतदान ओळखपत्रांवर फक्त ‘एपिक क्रमांक’ असून मतदाराचे नाव व पत्ता नसल्याचे पुरावे सादर करण्यात आले. ‘ही चूक नाही, तर जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे. कोरे मतदान कार्ड म्हणजे ‘ब्लॅँक चेक’ असून त्याचा वापर करून कोणीही बोगस मतदान करू शकते,’ असा आरोप त्यांनी केला.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

