सर्वधर्मीय स्मशानभूमी कागदावरच दहा वर्षांत एक वीटही रचली नाही

सर्वधर्मीय स्मशानभूमी कागदावरच दहा वर्षांत एक वीटही रचली नाही

Published on

सर्वधर्मीय स्मशानभूमी १० वर्षे कागदावरच
शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ ः घोडबंदर परिसरातील भाईंदरपाडा येथील सर्वधर्मीय स्मशानभूमी प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याआधीच ‘हरवली’ असल्याचे चित्र दिसत आहे. २०१६ मध्ये निर्णय, २०१९ मध्ये भूमिपूजन, परंतु १० वर्षे उलटूनही अद्याप कामाला मुहूर्त मिळाला नसल्याने ही स्मशानभूमी अजूनही कागदावरच आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी दूरवरची फरपट सहन करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ठाण्यातील घोडबंदर भागाची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, दाऊदी बोहरा व लिंगायत समाजासाठी संयुक्त स्मशानभूमी उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने २०१६ मध्ये घेतला होता. हरित विभागातून जमीन वगळून शासनाने परवानगीही दिली. २०१९ मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते.
............................
२५ हजार चौ. मी. जागेवर स्मशानभूमीसह उद्यान, पार्किंग आदी सुविधा देण्याचे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. २०२१ मध्ये ‘बालाजी एंटरप्रायझेस’कडे विकासकाम देण्यात आले, परंतु प्रत्यक्ष स्मशानभूमी उभारण्याऐवजी ३५ कोटींचा टीडीआर वापरून इमारत विकास सुरू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी ख्रिश्चन समाजाचे मेलविन फर्नांडिस यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
.....................
कोर्टाचे आदेश धाब्यावर
२५ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने तीन आठवड्यांत स्थिती स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले, मात्र आजतागायत महापालिकेने ते सादर केलेले नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठवून पाणी, रस्ते, टॉवर्स होतात; मग स्मशानभूमीचे काम का रखडले, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच तातडीने काम सुरू न झाल्यास महापालिकेच्या तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com