अमली पदार्थाच्या माध्यमातून सत्ताधारी महाराष्ट्र नासवत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्शवर्धन सपकाळ यांची टीका
‘अमली पदार्थातून सत्ताधारी महाराष्ट्र नासवत आहेत’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्शवर्धन सपकाळ यांची टीका
भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : सत्ताधारी भ्रष्टाचारी बनले आहेत, आता भ्रष्टाचारातून पैसा कमी पडू लागला असल्याने आता अमली पदार्थांचे कारखाने थाटून महाराष्ट्राला नासविण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाईंदर येथे केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर काँग्रेसकडून भाईंदर येथे गुरुवारी (ता. १८) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत आदी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सत्तेचा वापर करत भाजपचे आमदार व नेते दलाल बनले असून, त्याच्या मध्यमातून ते भ्रष्टाचार करत आहेत. सत्तेचे संतुलन पूर्णपणे बिघडल्याचे या वेळी सपकाळ म्हणाले. तर ‘भ्रष्टाचाराला कोणतीही सीमा राहिलेली नाही. उपमुख्यमंत्री शेती करण्यासाठी गावी जातात, ते कोणती शेती करतात हे त्यांनाच ठाऊक, मात्र त्यांच्या शेताजवळच त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांचे शेत आहे व त्या शेतात एमडी या अमली पदार्थाचा कारखाना आढळून आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या घरातील माणसे अमली पदार्थाच्या कारखान्यात आढळत आहेत, याची त्यांना लाज वाटली पाहिजे. अमली पदार्थ्यांच्या काळ्या धंद्याच्या गोरखधंद्यातून शिवसेना पैसे कमवत आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.’ असा घणाघातही सपकाळ यांनी केला. या वेळी मिरा-भाईंदरचे माजी आमदार दिवंगत गिल्बर्ट मेन्डोन्सा यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
..............................
एकीकडे खोटे बोलणारे पंतप्रधान देशाला लाभले आहेत, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील कमी नाहीत. मुख्यमंत्री जाती व धर्मांमध्ये भांडणे लावत आहेत, पक्ष फोडत आहेत. राज्यातील अराजकतेला व हिंसाचारालाही मुख्यमंत्रीच कारणीभूत असल्याची टीका त्यांनी या वेळी केली.
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

