तलासरीत पशुपालक प्रशिक्षण शिबिर

तलासरीत पशुपालक प्रशिक्षण शिबिर

Published on

तलासरीत पशुपालक प्रशिक्षण शिबिर
तलासरी (बातमीदार)ः पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय तालुकास्तरीय पशुपालक प्रशिक्षण, प्रात्यक्षिक माहितीस जनजागृती शिबिर तलासरी येथे उत्साहात पार पडले. या शिबिरात तालुक्यातील १५० हून अधिक शेतकरी व पशुपालकांनी सहभाग नोंदवला. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये वराह, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन, लम्पी स्किन डिसीज, पीपीआर रोग, वंध्यत्व समस्या, पशुखाद्य व पोषण व्यवस्थापनावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com