महामार्गामुळे ३०० घरे बाधित
महामार्गामुळे ३०० घरे बाधित
पुनर्वसन करण्याची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
पालघर, ता. २० (बातमीदार) ः जव्हार तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे ३०० घरे बाधित होण्याची शक्यता आहे. या कुटुंबांना न्याय, पारदर्शक कालमर्यादेत योग्य भरपाई तसेच पुनर्वसनाची मागणी खासदार सवरा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे रस्ता ओलांडताना नागरिक, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या परिसरात अनेक अपघात घडले आहेत. या महामार्गावर उड्डाणपुलासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३० मे २०१८ आवश्यक तपासणी अहवालानंतर पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठवल्याचे नमूद केले होते; मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत आहे.
--------------------------------
सेवा रस्ता बांधा
पालघर लोकसभा मतदारसंघातील नवसई (भाताणे) गावाजवळ वडोदरा एक्स्प्रेस हायवेचे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा मार्ग पूर्णतः बंद झाला होता. यासंदर्भात ठाणे (पश्चिम) कार्यालयास अवगत करण्यात आले होते. त्या वेळी पर्यायी सेवा रस्ता बांधण्याचे आश्वासन दिले; मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित प्रवेश मिळावा, यासाठी सेवा रस्त्याची मागणी केली आहे.

