पुन्हा पावन होणार उल्हासनगरची धरा… श्री
उल्हासनगरमध्ये श्रीकृष्ण भक्तीचा महाकुंभ
श्रीमद् भागवत कथेचा आध्यात्मिक महोत्सव सुरू
उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : संत-महात्म्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या उल्हासनगरच्या भूमी अध्यात्मिक तेजाने उजळून निघणार आहे. शहरातील भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणारी श्रीमद् भागवत कथा गुरुवारी (ता. १८) मोठ्या उत्साहात सुरू झाली असून, संपूर्ण शहर आता कृष्णमय झाले आहे. ही कथा सलग गुरुवार (ता. २५)पर्यंत चालणार असून, या काळात भक्तांना भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे श्रवण करून आध्यात्मिक समाधान लाभणार आहे.
श्रीमद् भागवत कथेचे आयोजन राठोड परिवाराच्या वतीने करण्यात आले असून, ही पवित्र कथा सचखंड दरबार येथे सुरु आहे. या प्रसंगी विविध संत-महात्मे, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि शहरातील असंख्य भक्तगण मोठ्या श्रद्धेने सहभागी होत आहेत. या कथेचे कथावाचन वैष्णवाचार्य श्री आदित्य गोस्वामी यांच्या होत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या लीला ऐकण्यासाठी उल्हासनगरसह आसपासच्या परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
या सात दिवसीय आध्यात्मिक सोहळ्याचा समारोप गुरुवारी पूर्णाहुती व महाप्रसाद (भंडारा) यांच्यासह होणार आहे. या पावन कथेचा लाभ घेण्याचे आवाहन लक्ष्मण राठोड आणि त्यांच्या पत्नी आशा राठोड परिवाराच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.
भक्ती, शक्ती आणि मुक्तीचा संगम
कथेच्या पहिल्या दिवसापासूनच विविध धार्मिक विधी, भजन आणि कीर्तनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. राठोड परिवाराने आयोजित केलेल्या या सोहळ्यात शहरातील अनेक संत-महात्मे आणि मान्यवर उपस्थिती लावत आहेत. दैनंदिन कथाश्रवणामुळे भाविकांना मानवी जीवनाचे सार्थक आणि आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

