उल्हासनगर महापालिका निवडणुकीची सूत्रे अनुभवी आमदार कुमार आयलानीकडे

उल्हासनगर महापालिका निवडणुकीची सूत्रे अनुभवी आमदार कुमार आयलानीकडे

Published on

उल्हासनगर निवडणुकीची सूत्रे कुमार आयलानीकडे
उल्हासनगर, ता २० (वार्ताहर) : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने सर्वात अनुभवी चेहरा मैदानात उतरवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उल्हासनगर पालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून आमदार कुमार आयलानी यांची नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरातील राजकीय वातावरण तापले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
पालिकेसाठी मतदान प्रक्रिया १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत पक्षांतर्गत ताळमेळ राखणे, उमेदवारांची निवड आणि प्रचाराची रणनीती आखण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने कुमार आयलानी यांच्या संयमी आणि अनुभवी नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. कुमार आयलानी म्हणाले, माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने पार पाडेन. उल्हासनगरमध्ये भाजपचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी आणि ठामपणे काम करणार आहे.
आमदारांकडे निवडणूक प्रभारीपदाची सूत्रे आल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात संघटन मजबूत करून, एकदिलाने काम करत आगामी निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रदेशाध्यक्षांचे आभार
प्रदेशाध्यक्षांच्या या विश्वासाबद्दल कुमार आयलानी यांनी आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, संघटनेने त्यांच्यावर टाकलेला हा विश्वास सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यशैली लक्षात घेऊनच ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com