वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची वाट बिकट

वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची वाट बिकट

Published on

वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची वाट बिकट
धरमतर ते पळी, अलिबागपर्यंत अरुंद रस्‍त्‍यामुळे वाहनांच्या रांगा
पोयनाड, ता. २० (बातमीदार) ः सध्या नाताळ व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाचा हंगाम जोमात सुरू असून अलिबाग, मुरूड, नांदगाव, नागाव, किहीम, काशीद आदी समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांचा मोठा ओघ वाढला आहे. मात्र या पर्यटनाचा आनंद वाहतूक कोंडीमुळे हिरावला जात असल्याचे चित्र सध्या पोयनाड परिसरात दिसून येत आहे. विशेषतः वडखळ–अलिबाग राज्यमार्गावर धरमतर ते पळी आणि पुढे अलिबागपर्यंत सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकही त्रस्त झाले आहेत.
या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून रस्ता अरुंद असल्याने तसेच वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोंडी अधिक तीव्र होत आहे. एरवी १५ ते २० मिनिटांत पार होणारे अंतर शनिवारी व रविवारी एक ते दीड तास लागत असल्याने पर्यटक हैराण झाले आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, स्थानिक व्यापारी तसेच एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. अलिबाग आणि मुरूड परिसरात राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत असून शाळा व महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींचीही संख्या वाढली आहे. मात्र वडखळ–अलिबाग राज्यमार्गावरील वाहतूक कोंडीमुळे या सहलींच्या एसटी बसेसना शहाबाज ते पळी आणि पुढे अलिबागपर्यंत तासनतास एकाच ठिकाणी थांबावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे वेळापत्रक कोलमडत असून चालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे म्हणजे लेनची शिस्त न पाळणे, एका मार्गिकेवर दोन ते तीन रांगा लावून वाहने उभी करणे, मधोमध घुसखोरी करणे, तसेच खरेदीसाठी रस्त्यावरच वाहने उभी करणे ही आहेत. यामुळे पोयनाड परिसरात वारंवार वाहतूक ठप्प होत आहे. या गंभीर समस्येकडे वाहतूक पोलिस व संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य नियोजन करावे, अशी मागणी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
..................
चौकट :
कोंडी होण्याची कारणे

वाहतूक नियमांचे उल्लंघन

एका लेनमध्ये दोन ते तीन वाहनांच्या रांगा

वाहनांच्या रांगेत मधोमध घुसखोरी

खरेदीसाठी रस्त्यावरच वाहन उभे करणे

नाक्यांजवळ व वळणांवर वाहने थांबवणे

शहाबाज ते पेझारी दरम्यान अंतर्गत रस्त्यांचा गैरवापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com