पुरातत्व विभागाचे नियम पायदळी

पुरातत्व विभागाचे नियम पायदळी

Published on

पुरातत्व विभागाचे नियम पायदळी
वसई किल्ल्याचे चित्रपटाच्या चित्रीकरणाने नुकसान
विरार, ता.२०(बातमीदार)ः वसई किल्ल्यात चित्रीकरणासाठी पुरातत्त्व विभागाच्या अधिनियमानुसार नियमावली आखण्यात आली आहे. पण या नियमांना वेब सिरीज, चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी केराची टोपली दाखविण्यात आल्याने इतिहासप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वसईतील ऐतिहासिक किल्ल्यात फ्रान्सिस्कन चर्चमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. या चित्रीकरणावेळी शिलालेखावर चूल लावण्यात आल्याचे आढळून आले. याच बरोबरच ऐतिहासिक वास्तूत विविध ठिकाणी सेट्स उभारून हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर शुक्रवारी सकाळी काही कलाकार धूम्रपान करत असल्याचे निर्दशनास आले होते. त्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या असून एका चित्रपटाचे चित्रीकरणावेळी मोठ्या प्रमाणात कचरा करण्यात आला होता.
----------------------------
कारवाईत दिंरगाई
पुरातत्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे यांनी शुक्रवारच्या घडलेल्या घटनेसंदर्भात तक्रार देणार असल्याची माहिती दिली. तर वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी पुरातत्त्व विभागाकडून तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com