नोव्हेंबरपर्यंत ८१३ श्वानांची नसबंदी

नोव्हेंबरपर्यंत ८१३ श्वानांची नसबंदी

Published on

नोव्हेंबरपर्यंत ८१३ श्वानांची नसबंदी
१२ वर्षांत १९ हजारांचा टप्पा पार; निर्बीजीकरण हाच कायदेशीर मार्ग
तुर्भे, ता. १० (बातमीदार) : शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या श्वान निर्बीजीकरण उपक्रमाला लक्षणीय यश मिळाले आहे. गेल्या १२ वर्षांत नवी मुंबईत तब्बल १९ हजार ५७८ भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) नोव्हेंबरपर्यंत ८१३ श्वानांची नसबंदी करण्यात आली असून, रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणालाही प्राधान्य देण्यात आले आहे.
भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी निर्बीजीकरण हाच कायदेशीर व मानवी मार्ग आहे. पूर्वी विषप्रयोग किंवा अमानवी पद्धती वापरल्या जात असत. दरम्यान, प्राणी संवेदनशीलता वाढल्यानंतर व प्राणीप्रेमी संस्थांच्या पुढाकारामुळे निर्बीजीकरण उपक्रम देशभरात स्वीकारला गेला. नवी मुंबई महापालिका २००६ पासून ही मोहीम सातत्याने राबवत आहे. अलीकडच्या काळात श्वानांना खाद्य देण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
दरमहा साधारण १०० ते १५० श्वानांची नसबंदी केली जाते. श्वान पकडून त्यांची नसबंदी, कानावर ओळख चिन्ह (मार्क), रेबीज लस देऊन त्यांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडले जाते. जखमी श्वानांवर उपचार केले जातात; गंभीर जखमी श्वानांना काही दिवस उपचाराखाली ठेवण्यात येते. या उपाययोजनांमुळे श्वानसंख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होत आहे, असे मनपाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत तोडकर यांनी सांगितले.

आकडेवारी
२०१३-१४ ते २०२३-२४ : १८,७६५ श्वानांची नसबंदी
२०२३-२४ : १,३४५ नसबंदी | ७,१५६ लसीकरण
२०२५-२६ (नोव्हेंबरपर्यंत) : ८१३ नसबंदी
२०२५-२६ : ४,४५९ श्वानांवर उपचार
वर्षभरात चावण्याच्या घटना : ५,२८४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com