डंपरची स्कूल व्हॅनसह रिक्षाला धडक

डंपरची स्कूल व्हॅनसह रिक्षाला धडक

Published on

कामोठे, ता. २० (बातमीदार) : नवीन पनवेल सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कूल व्हॅन, तसेच रिक्षाला पाठीमागून एका डम्परने जोरदार ठोकर मारली. या अपघातात दोन मुले, रिक्षाचालक आणि प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ नवीन पनवेल येथील रुग्णालयामध्ये पाठवले.

शनिवारी (ता. २०) सकाळी झालेल्या या अपघातात स्कूल व्हॅन व रिक्षा यांचे नुकसान झाले. अपघातात स्कूल व्हॅनचे दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे मुले व्हॅनमध्ये अडकून पडली होती. घटनास्थळी व आजूबाजूला असणारे पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी स्कूल व्हॅनची काचेची खिडकी फोडून मागील बाजूचा पाइप ओढून व्हॅनमधील १२ मुलांना सुखरूप बाहेर काढले. शेकाप माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांनी घटनास्थळी उपस्थित असताना मदतीचा हात दिला. पोलिसांनी रिक्षामध्ये जखमी अवस्थेत अडकलेल्या चालकाला अर्धवट फुटलेली काच तोडून बाहेर काढले. या अपघातानंतर जनसमुदायाने डम्परचालकाच्या अंगावर धावून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी डम्परचालकाला पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com