क्रीडाप्रेमींसाठी आनंदवार्ता
क्रीडाप्रेमींसाठी आनंदवार्ता
वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव होणार
विरार, ता. २३ (बातमीदार)ः निवडणूक आचारसंहितेमुळे विभागीय शालेय कला-क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव रद्द होणार असल्याची चर्चा होती, परंतु २६ डिसेंबरपासून स्पर्धा सुरू होणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.
वसई तालुका महापालिका स्थापने आधीपासून गेली ३५ वर्षे कला-क्रीडा महोत्सव अविरतपणे सुरू आहे. या महोत्सवामुळे वसई तालुक्यातील हजारो कलाकार, क्रीडापटू घडले आहेत. या माध्यमातून वसईची परंपरा, संस्कृती जोपासण्याचे भरीव कार्य सुरू आहे. या महोत्सवात सेपाक टाक्रो (किक व्हॅालीबॅाल), आर्म रॅसलिंग (पंजा लढविणे) नवीन क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके होणार आहेत. याचबरोबरक नव्याने सुरू केलेल्या दहिहंडी, लाठीकाठी स्पर्धेमध्ये सात महिलांची पथके, तर लाठीकाठीमध्ये २५ महिला स्पर्धक सहभागी होणार आहेत.
===============================================
‘वसई श्री’चे आकर्षण
क्रीडा विभागात कबड्डी, बॅडमिंटन, शरीर सौष्ठव, खो-खो, व्हॉलीबॉल, शूटिंग बॉल, कराटे, टेबल टेनिस स्पर्धेबरोबर मास्टर दत्ताराम रंगमंचावर रंगणारी शरीर सौष्ठव ‘वसई श्री’ स्पर्धा आकर्षण ठरणार आहे. तर सौंदर्य स्पर्धेतील ‘मिस्टर पर्सनॅलिटी’, ‘मिस पर्सनॅलिटी’ पाहायला मिळते. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न होणाऱ्या कला विभागातील एकांकिका, लोकनृत्य, रांगोळी स्पर्धांचा समावेश आहे.
====================================================
क्रीडा प्रकारांमध्ये वाढ
कबड्डी २४५ संघ, खो-खो १३८ संघ, लंगडी- ५१ संघ, लगोरी ५० संघ, व्हॉलीबॉल ७२ संघ, शूटिंग बॉल ८ संघ, थ्रो बॉल १५ संघ, रिंग फुटबॉल ८६ संघ तर बास्केटबॉल स्पर्धेमध्ये ५६ संघ सहभागी होत आहेत. पारितोषिक विजेत्या कला व क्रीडापटूंना ७,४५० पेक्षा जास्त प्रमाणपत्रे, ९१५ सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके प्रदान करण्यात येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

