मातृभाषेवरील प्रभूत्व गरजेचे
मातृभाषेवरील प्रभुत्व गरजेचे
माजी प्राचार्य ज्यो आल्मेडा यांचे प्रतिपादन
वसई, ता. २३ (बातमीदार)ः मूल्यवर्धन, सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा मूळ उद्देश शिक्षणाचे बाजारीकरण, भ्रष्टाचारामुळे मागे पडत आहे. त्यामुळे मातृभाषेवर प्रभुत्व असल्यास इतर कोणतीही भाषा सहज अवगत करता येते, असे मत माजी प्राचार्य रे. फा. ज्यो आल्मेडा यांनी दिला.
नंदाखाल येथे सेंट जोसेफ शिक्षण संस्थेचा वार्षिक क्रीडा महोत्सव झाला. या वेळी संस्थेचे माजी प्राचार्य रे. फा. ज्यो आल्मेडा यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकविण्यात आला. राष्ट्रगीतानंतर प्रमुख अतिथी नॉर्बट फरगोज यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. संस्थेचे संचालक, प्राचार्य, विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांनी संचलन केले. या वेळी सेवानिवृत्त प्राचार्य रे. फा. ज्यो आल्मेडा, शिक्षकेतर कर्मचारी रेखा चव्हाण, सेवेत २५ वर्षे पूर्ण केलेल्या उपप्राचार्या जेनी गोम्स यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे प्राचार्य रे.फा.विजय लोबो यांनी क्रीडा महोत्सवाबाबत माहिती दिली.
---------------------------------
विद्यार्थ्यांचा सन्मान
मानवी मनोरे, मल्लखांब आणि एरोबिक्स, ज्यू. कॉलेज विद्यार्थ्यांचा कबड्डीचा सामना रंगला. यावेळी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रे. फा. डॉमनिक डीआब्रिओ यांनी उपस्थितांना क्रीडाशपथ दिली.

