एमसीएच्या आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यांचे यशस्वी आयोजन

एमसीएच्या आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यांचे यशस्वी आयोजन

Published on

एमसीएच्या आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यांचे यशस्वी आयोजन
विविध वयोगटांतील सामन्यांना उत्तम प्रतिसाद; एमसीएकडून आरडीसीएच्या कार्याचे कौतुक
पोयनाड, ता. २३ (बातमीदार) ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेतील विविध वयोगटांतील सामन्यांचे रायगड जिल्ह्यात यशस्वीपणे आयोजन करण्यात आले, असे गौरवोद्गार एमसीएच्या स्पर्धा समितीचे अध्यक्ष राजू काणे यांनी काढले. नुकतेच रायगड जिल्ह्यातील विविध मैदानांवर ही स्पर्धा पार पडली असून, तिचे संपूर्ण नियोजन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए) यांनी प्रभावीपणे केले होते. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार व सचिव ॲड. कमलेश पिसाळ यांच्या सूचनेनुसार तसेच एमसीएच्या कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षीपासून रायगड जिल्ह्याला एमसीएच्या निमंत्रित आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सामने आयोजित करण्याची संधी देण्यात आली आहे. आरडीसीएने ही जबाबदारी पूर्ण क्षमतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडल्याचे एमसीएच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षी रायगड जिल्ह्यात १६ वर्षांखालील मुलांच्या एकूण १५ दोनदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते, तर चालू क्रिकेट हंगामात १९ वर्षांखालील मुलांच्या १५ दोनदिवसीय सामन्यांचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आले. या स्पर्धांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा रायगड जिल्ह्यात क्रिकेटसाठी आलेल्या खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

Marathi News Esakal
www.esakal.com