मच्छीमारांच्या पुनर्वसनाला प्राधान्यः जाखड

मच्छीमारांच्या पुनर्वसनाला प्राधान्यः जाखड

Published on

मच्छीमारांच्या पुनर्वसनाला प्राधान्य ः जाखड
वाढवणमध्ये सामाजिक, आर्थिक, उपजीविकेच्या दृष्टीने सर्वेक्षण होणार
पालघर, ता. २३ (बातमीदार)ः प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील मच्छीमारांचे सामाजिक, आर्थिक, उपजीविकेच्या दृष्टीने सर्वेक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत त्या बोलत होत्या.
प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील मच्छीमारांचे सर्वेक्षण होणे आवश्यक असून, सामाजिक, आर्थिक आणि उपजीविकेच्या दृष्टीने सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. मच्छीमारांच्या वास्तव परिस्थितीची अचूक नोंद होणे, त्यांचे हक्क, उपजीविकेवर होणारा परिणाम, भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. या वेळी संबंधित विभागांचे अधिकारी, बाधित क्षेत्रातील मच्छीमार संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी सखोल चर्चा केली. प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील मच्छीमारांचे सर्वेक्षण कशा पद्धतीने करावे, तसेच सर्वेक्षण धोरण कसे असावे, याबाबत विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.
---------------------------------
सर्वेक्षणाला वेग
जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक सर्वेक्षणाबाबत माहिती देत सर्वेक्षण प्रक्रियेची रूपरेषा स्पष्ट केली. बैठकीत बाधित क्षेत्रातील मच्छीमार संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी, सध्या बाधित होणाऱ्या १६ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील इतर मच्छीमारांचेही सर्वेक्षण होणे अत्यावश्यक असल्याची भूमिका मांडली.

Marathi News Esakal
www.esakal.com