किल्ले बांधणी, निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
किल्ले बांधणी, निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
सह्याद्री मित्र परिवार व मयूर वाचनालयाचा संयुक्त कार्यक्रम
पालघर, ता. २३ (बातमीदार) : सह्याद्री मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी सुट्टीच्या कालावधीत घेण्यात आलेल्या विभागवार किल्ले बांधणी स्पर्धा आणि मयूर वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या रंगभरण, चित्रकला, निबंध व हस्ताक्षर अशा शालेय स्पर्धांचा संयुक्त पारितोषिक वितरण समारंभ रविवारी मयूर वाचनालयाच्या सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाला दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री मित्र परिवाराच्या किल्ले बांधणी स्पर्धेत माकुणसार विभागातून देवाची डोंगरी (राजगड प्रतिकृती) प्रथम, ब्राह्मणआळी (माहुली किल्ला प्रतिकृती) द्वितीय, तर राऊतवाडी (मुरूड जंजिरा प्रतिकृती) व शिवाजीनगर (विजयदुर्ग प्रतिकृती) यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला.
केळवे विभागातून भरणेपाडा (प्रतापगड प्रतिकृती) प्रथम, बंदरपाखाडी (शिवाजी जिम्को ग्रुप) द्वितीय, तर अर्णव-यश्वी गटाने तृतीय क्रमांक पटकावला. मथाणे विभागातून संस्कृती रक्षक टीम प्रथम, रामकुटीर गडसंवर्धन टीम द्वितीय, तर विहाना राऊत यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
३५ विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र
मयूर वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या एकूण ३५ विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

