बी. के. बिर्ला महाविद्यालयात एम पॉवर युथोपियाचे भव्य आयोजन
बिर्ला महाविद्यालयात बिर्लोत्सवचा उत्साह
सहा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : कल्याण येथील बी. के. बिर्ला महाविद्यालयात बिर्लोत्सव या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांतर्गत ‘एमपॉवर युथोपिया’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या सहकार्याने पार पडलेल्या या दोन दिवसीय महोत्सवात सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीरजा बिर्ला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या महोत्सवात ९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी परेडमध्ये सहभाग घेऊन मानसिक आरोग्याचा संदेश दिला. याप्रसंगी भारतीय बॉय बँड ‘९ टीन’ यांच्या विशेष संगीत मैफलीने कार्यक्रमात चैतन्य भरले. संगीत आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून त्यांनी युवकांना आशा आणि सक्षमीकरणाचा संदेश दिला. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपप्राचार्य, सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी संसदेचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

