पहिल्याच दिवशी विक्रमी नामनिर्देशन पत्रांचे वाटप
पहिल्याच दिवशी अर्जांचे विक्रमी वाटप
हजारचा टप्पा पार; इच्छुकांची अर्ज घेण्यासाठी झुंबड
ठाणे, ता. २३ : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमधील जागावाटपाचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच असताना उमेदवारांनी मात्र प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची जय्यत तयारी केली आहे. नामनिर्देशनपत्र वाटपाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच मंगळवारी (ता. २३) ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांमध्ये एक हजार ६९ अर्जांचे विक्रमी वाटप झाले.
निवडणूक विभागाने मंगळवारपासून अर्ज वाटपास सुरुवात केली. युती किंवा आघाडीमध्ये आपली जागा कोणाला सुटणार, याची प्रतीक्षा न करता अनेक इच्छुकांनी पहिल्याच दिवशी अर्ज पदरात पाडून घेण्यास पसंती दिली. यामुळे सर्वच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये सकाळपासूनच इच्छुकांची आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली.
अर्ज वाटपाची आकडेवारी
प्रभाग समिती संबंधित प्रभाग क्रमांक वाटप केलेले अर्ज
लोकमान्यनगर, सावरकरनगर ६, १३, १४, १५ १७७
माजिवडा मानपाडा १, २, ३, ८ १५७
कळवा ९, २३, २४, २५ १२१
नौपाडा कोपरी १९, २०, २१, २२ ११३
वर्तकनगर ४, ५, ७ १०३
वागळे १६, १७, १८ १०२
उथळसर १०, ११, १२ १०१
दिवा २७ ते २९, ३३ १२४
मुंब्रा २६, ३०, ३१, ३२ ७१

