पाणी टंचाईमुक्त मोखाडासाठी एकत्र

पाणी टंचाईमुक्त मोखाडासाठी एकत्र

Published on

पाणीटंचाईमुक्त मोखाड्यासाठी एकत्र
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक

मोखाडा, ता. २३ (बातमीदार) : मोखाडा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना ही राज्यासाठी आदर्श ठरणारी आहे. मात्र याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. याशिवाय वीजबिल हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भरायचे की ग्रामपंचायतीने, याबाबतदेखील अनेक तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची मोखाडा तालुक्यात एक संयुक्त बैठक पार पडली. त्यात सामोपचाराने या तक्रारी सोडवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
बैठकीत लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या पुढील काही दिवसांतच सोडविण्यासंदर्भात सूचना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या आहेत. मोखाडा तालुक्यासाठीची ही पाणीपुरवठा योजना दोन भागांत विभागलेली आहे. अप्पर वैतरणा येथून मोखाडा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत विभागापर्यंत पाणीची टाकी बांधणे अशी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देण्यात आलेली आहे. गावातील टाकीपासून घरापर्यंतची नळजोडणी ही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून होत आहे. सद्य:स्थितीत जीवन प्राधिकरणाकडून केवळ तीन टाक्यांचे काम अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ५५ गावांपैकी ३५ गावांना पाणीही जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यानंतर कोणत्या गावात पाणी जाते, असा दावा प्रशासन करत होते. त्यावर तत्काळ तेथील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडून सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली.
या वेळी अनेक ग्रामपंचायतींना पाणी जात असले तरी अनेक छोट्या-मोठ्या तक्रारीसुद्धा या वेळी सरपंचांनी मांडल्या. यावर तत्काळ तोडगा काढण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. जल जीवन मिशनच्या पाहणीसाठी केंद्रातून १५० एजन्सी नेमलेल्या असून, त्यांच्याकडून सर्वेक्षण होणार असल्याचे या वेळी खासदार हेमंत सवरा यांनी सांगितले. तर वीजबिलाचा प्रश्न गंभीर असून लवकरच मुख्यमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री यांच्यासोबत एक बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन या वेळी सवरा यांनी दिले.
सरपंच, ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार करून ही पाणीपुरवठा योजना यशस्वी करायला हवी, असे आवाहन आमदार हरिश्चंद्र भोये यांनी केले. यापुढे पाणी या विषयावरच काम करून ग्रामस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून या योजना यशस्वी कराव्यात, अशा सूचना या वेळी दिल्या. जुन्या पेयजल योजनांच्या टाक्यांचासुद्धा उपयोग करून ज्या ठिकाणी नवीन टाक्यांची निर्मिती करायची असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले.


पाणी समस्या सोडवण्यासाठी शपथ

बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. या वेळी या बैठकीच्या नियोजनाबरोबरच तालुक्यातील कोणत्या गावातील काय अडचणी आहेत, यादेखील अभ्यासपूर्ण त्यांनी मांडल्याचे दिसून आले. एवढेच काय तर संपूर्ण बैठकच त्यांनी चालविल्याचे या वेळी दिसले. सर्वांनी सकारात्मक राहून आपण मोखाडा तालुक्यातील पाणीटंचाई मुळासकट संपवू या, अशी शपथदेखील त्यांनी सर्वांना दिली. याचबरोबर या बैठकीत केवळ तक्रारी न मांडता अडचणी आणि त्यावर कशी मात करता येईल, याबाबत सर्वांनी मार्गदर्शन करावे, अशा सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com