ज्ञानपीठ विजेते लेखक विनोद कुमार शुक्ल

ज्ञानपीठ विजेते लेखक विनोद कुमार शुक्ल

Published on

ज्ञानपीठ विजेते लेखक विनोद कुमार शुक्ल

रायपूर, ता. २३ : हिंदी साहित्यविश्वातील थोर लेखक आणि ५९व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी विनोद कुमार शुक्ल (वय ८९) यांचे मंगळवारी रायपूर येथे निधन झाले. श्वसनासंबंधीच्या त्रासामुळे त्यांना रायपूरच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद कुमार यांचा मुलगा शाश्वत शुक्ल यांनी ही माहिती दिली. शुक्ल यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबरीसाठी त्यांना ५९व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विनोदकुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत झाले. आपल्या लेखनाची सुरुवात त्यांनी काव्यलेखनाने केली. लगभग जयहिंद (१९७१), वह आदमी नया गरम कोट पहिनकर चला गया विचार की तरह, सब कुछ होना बचा रहेगा, अतिरिक्त नहीं, कविता से लंबी कविता, आकाश धरती को खटखटाता है, पचास कविताएँ, कभी के बाद अभी, कवि ने कहा, प्रतिनिधि कविताएँ हे त्यांचे कवितासंग्रह रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. विनोदकुमार शुक्ल यांच्या कादंबऱ्या हिंदी साहित्यात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. नौकर की कमीज़, खिलेगा तो देखेंगे, दीवार में एक खिड़की रहती थी, हरी घास की छप्पर वाली झोपड़ी और बौना पहाड़, यासि रासा त आणि एक चुप्पी जगह या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या आहेत. पेड़ पर कमरा, महाविद्यालय, एक कहानी आणि घोड़ा और अन्य कहानियाँ हे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘नींद की दूरी और अन्य कहानियाँ’, ‘महाविद्यालय’ हे त्यांचे कथासंग्रह विशेष गाजले. त्यांच्या साहित्यकृतींना अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना मानाचा व्यास सन्मान मिळाला. २०२३ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले होते.
...
पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर शोक व्यक्त करीत म्हटले आहे, की ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रख्यात लेखक विनोद कुमार शुक्ल यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. हिंदी साहित्याला दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी ते सदैव स्मरणात राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com