उल्हासनगरात खुशहालीसाठी १५१ ब्राह्मणांना ब्रह्मभोज
उल्हासनगर, ता. २३ (बातमीदार) : शहरात आनंदी आणि गुण्यागोविंदाचे वातावरण कायम राहावे, या उद्देशाने शिवसेनेचे विभागप्रमुख सुनीलसिंग (कलवा) आणि त्यांची पत्नी सामाजिक कार्यकर्त्या किरण सुनीलसिंग (चिमनानी) यांच्या वतीने उल्हासनगरात १५१ ब्राह्मण पंडितांसाठी ब्रह्मभोज घेण्यात आला होता. कार्यक्रमासाठी विविध ठिकाणांहून १५१ ब्राह्मण पंडित उपस्थित होते. सर्व पंडितांना विधिवत भोजनदान करण्यात आले. त्यांना सन्मानपूर्वक भेटवस्तूही देण्यात आल्या.
निवडणुकीचा काळ असल्याने काहींना या कार्यक्रमाबाबत वेगळा अर्थ वाटू शकतो; मात्र हा उपक्रम कोणत्याही राजकीय हेतूने नसून, दरवर्षी परंपरेने होत असल्याचे सुनीलसिंग आणि किरणसिंग यांनी स्पष्ट केले. यंदाच्या ब्रह्मभोज कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, मोठ्या संख्येने ब्राह्मण पंडितांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला शहरातील अनेक दिग्गज नेत्यांची व मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये माजी आमदार पप्पू कलानी, उद्योगपती सुमित चक्रवर्ती, सत्यम पुरी, सामाजिक कार्यकर्त्या मधु जाधवानी, ज्योती मोटवानी, लिसा इसराणी, आशा बनसोडे, ज्योती जयसवाल, सामाजिक कार्यकर्ते रामसूरत यादव, रामकृष्ण यादव, पंकज जयसवाल, धर्मराज यादव, राजकुमार यादव, भानसिंग यादव, मोहन मूलचंदानी, दीपक सेनानी, नीरज मखीजा, मोंटी होनेजा यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

