भिवंडीत १३ हजार १७९ मतदार सेम टू सेम

भिवंडीत १३ हजार १७९ मतदार सेम टू सेम

Published on

भिवंडीत १३ हजार १७९ सारखेच मतदार
नाव आणि फोटोमध्येही बदल नाही; प्रशासनाकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर दुबार मतदारांचा विषय चांगलाच गाजत आहे. त्यात आगामी महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी दुबार मतदारवरून रान पेटविले आहे. आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांचा विषय ऐरणीवर आल्यानंतर, भिवंडी महापलिका क्षेत्रातील पाच प्रभाग समितीमध्ये १३ हजार १७९ मतदार यांचे फोटो आणि नाव एकसारखी असल्याची बाब समोर आली आहे. या दुबार मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांनी त्यांना कोणत्या ठिकाणी मतदान करायचे आहे, त्यासंदर्भातील अर्ज भरून द्यावा लागणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

भिवंडी महापालिकेने प्रारूप यादी जाहीर केली. त्यानंतर हरकती-सूचना दाखल करण्यासाठी दिलेल्या कालावधीत हरकती-सूचना प्राप्त होऊन त्यावर सुनावणी झाली. भिवंडी महापलिका क्षेत्रातील पाच प्रभाग समितीअंतर्गत २७ हजार ३९३ दुबार मतदार असल्याचे सुरुवातीला आढळले. यामध्ये नाव एकसारखे असलेले व फोटो मात्र वेगळे असलेले सहा हजार ८५२ मतदार असल्याचे त्यात दिसले, तर सहा हजार ५०७ दुबार मतदारांचा प्रभाग समिती कार्यालयात शोध घेण्यात येणार आहे. असे असले तरी, दुसरीकडे भिवंडी पालिका क्षेत्रात १३ हजार १७९ मतदारांचे फोटो आणि नाव एकसारखे असल्याची बाब समोर आली आहे. या दुबार मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
----------
तक्ता

प्र. स. क्र. दुबार मतदार फोटो नावे सारखी नाव समान फोटो वेगळे दुबार शोध

१ ५९९० १६५५ ४३३५ ००

२ ५८२६ २२७१ ३२२ २३७७

३ ७३६१ ५२२५ १५३ १९८३

४ ४२३८ २१८६ १५६६ ४८६

५ ३९७९ १८४२ ४७६ १६६१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com