शिवसेना भाजपात सन्मानजनक युती होणार - एकनाथ शिंदे

शिवसेना भाजपात सन्मानजनक युती होणार - एकनाथ शिंदे

Published on

सन्मानजनक युती होणार!
दोन दिवसांत अंतिम स्वरूप ः एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : महापालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सन्मानजनक युती होईल. येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम स्वरूप दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. तसेच युती झाली पाहिजे, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडवणीस यांचे असून, ते प्रत्येक महापालिकेचा आढावा घेत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रकाश महाजन यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. या वेळी शिवसेना आणि भाजप विचारांची युती आहे. केंद्रात एनडीए सरकार आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम शिवसेना करत आहे. काहीजण स्वार्थासाठी, सत्तेसाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी युती करत आहेत, असा टोला शिंदे यांनी ठाकरे-मनसे युतीवर लगावला.

महायुती विजय
आगामी महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांचे विचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जातोय. यात महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. महाजन हे संयमी आणि मुद्देसूद बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्षप्रवेशाने यापुढे शिवसेनेला बळकटी मिळेल आणि ते शिवसेनेचे काम जनतेपुढे प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

हिंदुत्वावर काम करण्याची इच्छा
दरम्यान, अडीच वर्षे महाराष्ट्रात जातीयवादाचा वणवा पेटलेला असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो कुशलतेने हाताळला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना रोगमुक्त करण्याचे काम शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता शांततेत केले. हा त्यांचा मोठेपणा आहे. शिंदे यांनी केलेल काम लोक विसरणार नाहीत, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले. हिंदुत्वावर काम करण्याची इच्छा असल्याने आज शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रकाश महाजन यांनी या वेळी सांगितले. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले जे घरात बसून राहिले, परीक्षेला बसले नाहीत पण पहिले आले, मात्र एकनाथ शिंदे याला अपवाद ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com