रंगिबेरंगी कलरच्या टोपल्या ही म्हसा यात्रेची ओळख
म्हसा यात्रेत रंगीबेरंगी टोपल्यांचे आकर्षण
आदिवासी बांधवांच्या हस्तकलेतून सावरतेय अर्थचक्र
सरळगाव, ता. २७ (बातमीदार) ः ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या प्रसिद्ध ‘म्हसा यात्रे’ची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. या यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आदिवासी बांधवांनी हाताने तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रंगीबेरंगी बांबूच्या टोपल्या. या यात्रेत येणारा भाविक कितीही महागड्या गाडीतून आला, तरी परतताना आपल्या गाडीच्या टपावर या सुंदर टोपल्या बांधून नेल्याशिवाय राहत नाही. रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांच्या टपावर रंगीत टोपल्या दिसल्या की, ‘म्हसा यात्रा’ सुरू झाली, हे समीकरण आजही कायम आहे.
आजच्या प्लॅस्टिकच्या जमान्यातही या यात्रेत बांबूपासून बनवलेल्या वस्तूंना प्रचंड मागणी असते. आकाशात झेपावणारे आकाश कंदील, लहान मुलांची खेळणी, सुबक परड्या आणि विविध आकाराच्या टोपल्यांनी ही यात्रा सजते. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून, स्थानिक आदिवासी बांधवांच्या हाताला मोठा रोजगार मिळतो. या टोपल्या तयार करण्याचे काम आदिवासी बांधव वर्षभरापूर्वीच सुरू करतात; मात्र टोपल्यांना आकर्षक रंग देण्याचे काम यात्रेच्या काही दिवस आधी केले जाते. हे ताजे आणि उठावदार रंग ग्राहकांना आकर्षित करतात. बांबूच्या या विविध कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री हे यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते.
किंमत आणि आव्हाने
यात्रेत टोपल्यांची किंमत ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत असते. बांबूचे वाढते दर आणि वस्तू बनवण्यासाठी लागणारी प्रचंड मेहनत यामुळे किमती थोड्या वाढल्या आहेत. बांबू महाग झाल्याने वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागतात. त्यामुळे ग्राहकांना त्या कधीकधी महाग वाटतात, ज्याचा विक्रीवर परिणाम होतो, अशी खंत काही आदिवासी कारागिरांनी व्यक्त केली. तरीही घराची शोभा वाढवण्यासाठी आणि परंपरेचा भाग म्हणून ग्राहक या वस्तूंना मोठ्या आवडीने पसंती देतात. म्हसा यात्रेची खरी ओळख ही आजही या बांबूच्या हस्तकलेतच दडलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

