मुंबई
खटला फास्ट ट्रॅक वर चालवणार ,आरोपींना फाशी साठी प्रयत्न.
खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार ः शिंदे
खालापूर, ता. २७ (बातमीदार) ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. २७) मृत मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. मंगेश काळोखे हा सामान्य जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अशा पद्धतीने सूड उगवणे चुकीचे आहे. अशी वृत्ती ठेचून काढू, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आरोपींना मोक्का लागावा, तसेच खटला फास्ट ट्रॅकवर चालवून फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
या वेळी काळोखे यांचे नातेवाईक समर्थक यांनी आरोपींना आमच्यासमोर फाशी द्या, चांगला सरकारी वकील नेमा, असा आक्रोश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर केला.
-----
फोटो ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

