महिला असुरक्षित!

महिला असुरक्षित!

Published on

वर्षात ४४८ अत्याचाराच्या घटना
मिरा-भाईंदर, वसई-विरारमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांकडून १०० टक्के गुन्ह्यांची उकल
वसई, ता. २८ (बातमीदार) : एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे महिलांवरील शारीरिक अत्याचार, बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात बलात्काराचे ४४८ गुन्हे दाखल झाले असून, विनयभंगाच्या ५०१ घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षभरात एकूण ९५० हून अधिक महिलांना विविध प्रकारच्या अत्याचारांचा सामना करावा लागला. यामध्ये प्रेमसंबंधातील फसवणूक, लग्नाच्या भूलथापा, कौटुंबिक अत्याचार आणि कामाच्या ठिकाणी होणारी छेडछाड यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बलात्काराच्या ४४८ गुन्ह्यांपैकी पोलिसांनी सर्वच्या सर्व गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्तालयामार्फत ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून पीडित महिलांना मानसिक आधार दिला जात आहे. तसेच स्वरक्षणाचे धडे आणि पथनाट्यांद्वारे प्रबोधन केले जात आहे. विनयभंगाच्या ५०१ गुन्ह्यांपैकी ९० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी गुन्हेगारांपर्यंत पोहोचून कारवाई केली आहे.

बदनामीच्या भीतीने तक्रारींकडे पाठ?
अनेकदा समाजात बदनामी होईल, या भीतीने पीडित महिला किंवा त्यांचे कुटुंबीय तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत; मात्र आता जनजागृतीमुळे अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महिलांची संख्याही वाढत असल्याचे पोलिसांनी नमूद केले. हुंडाबळीसारखी दुर्दैवी घटनाही या वर्षात घडली असून, त्यातील आरोपीला त्वरित अटक करण्यात आली आहे.
-----------------
वर्षभरातील घटना - दाखल गुन्हे - अटक आरोपी
बलात्कार - ४४८ - ३६१
विनयभंग - ५०१ - २४२
हुंडाबळी - १ - १
------------
- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयात घडलेल्या गुन्ह्यांपैकी बलात्काराचे ४४८, विनयभंग ४९३ तर हुंडाबळीच्या एक गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली आहे तर अन्य गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क असून विविध उपक्रम राबवले जात आहेत. कोणत्याही अत्याचाराविरोधात महिलांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, जेणेकरून गुन्हेगारांवर कडक कारवाई करता येईल, असे मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com