चारोटी येथे झाडावर बिबट्या?

चारोटी येथे झाडावर बिबट्या?

Published on

चारोटी येथे झाडावर बिबट्या?
व्हायरल फोटोंमुळे नागरिकांमध्ये घबराट
कासा बातमीदार
डहाणू, ता. २९ : तलासरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सोशल मीडियावर खरे-खोटे फोटो व व्हिडिओ व्हायरल होत असल्याने घबराटीत आणखी भर पडत आहे.
डहाणू तालुक्यातील चारोटी येथे एका घरासमोरील झाडावर बिबट्या बसल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर पसरवला जात आहे. अनेक नागरिकांनी हा फोटो विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत चारोटी गावातील उपसरपंच प्रणय मेहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले, की संबंधित फोटो हा बनावट असून चारोटी परिसरात अशा प्रकारचा कोणताही बिबट्या आढळून आलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून वन विभागाची टीमही पाहणी करीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, डहाणू परिसरात बिबट्याचे अनेक बनावट (एआय-तयार) फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा खोट्या व अप्रमाणित वन्यजीव व्हिडिओंमुळे भीती, गोंधळ व गर्दी निर्माण होऊन वन विभागाच्या बचावकार्याला अडथळा येऊ शकतो. त्यामुळे अफवा पसरवणे किंवा दहशत निर्माण करणे कायद्याने गुन्हा ठरू शकते.
नागरिकांनी कोणताही फोटो किंवा व्हिडिओ खरा आहे की नाही याची खात्री न करता तो पुढे पाठवू नये. फक्त वन विभाग, पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अशा अफवांमुळे घबराट पसरते आणि बचावकार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून जबाबदारीने वागावे, असे कासा वन विभागाचे अधिकारी सुजित कोळी यांनी स्पष्ट केले आहे.
.....
फोटो अनेक ग्रुपवर वायरल होत असल्याने लहान मुले आणि महिलावर्गामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरत आहे. शासनाने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण पहाटे अनेक लहान मुले, विद्यार्थी तसेच कामगारवर्ग बाहेर जात असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com