दोन वर्षांत रायगडात लैंगिक अत्याचाराचे २३३ गुन्हे

दोन वर्षांत रायगडात लैंगिक अत्याचाराचे २३३ गुन्हे

Published on

दोन वर्षांत रायगडात लैंगिक अत्याचाराचे २३३ गुन्हे
२०६ आरोपींना अटक; १७२ मुलींचे अपहरण
अलिबाग, ता. ३० (वार्ताहर) ः गेल्या काही वर्षांत महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अत्याचाराचे एकूण २३३ गुन्हे दाखल झाले. त्यातील २०६ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचप्रमणे याच कालावधीत १७२ मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
अनेक वेळा लग्नाच्या भूलथापा देणे, एकतर्फी प्रेम प्रकरणे, विकृत मनोवृत्ती, राग अशा विविध कारणांमुळे महिलांवर लैंगिक अत्याचार केले जातात. अनेकदा असे प्रकार आजूबाजूचे लोक, नातेवाईक अथवा मित्रमंडळींकडून घडत असल्याने याचा महिलांवर मोठा मानसिक परिणाम होतो. रायगड जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे एकूण २३३ गुन्हे दाखल झाले असून त्यातील २०६ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशा घटनांमध्ये मुली, महिलांवर सामाजिक, कौटुंबिक दबाव असल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत नाही; मात्र यामुळे आरोपी मोकाट फिरतात. तारुण्यात एकमेकांच्या जवळ येण्याचे आकर्षण, एकतर्फी प्रेम प्रकरण, कामाच्या ठिकाणी असणारी स्पर्धा, त्यातून निर्माण होणारी इर्षा अशा कारणांमुळे महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटनांचा प्रतिबंध करण्यासाठी पीडितांनी पोलिस ठाण्यात तक्रार करणे आवश्यक आहे.
....................

वर्ष लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल अटक आरोपी
२०२४ १०६ ११३
२०२५ १२७ ९३


२०२४ मध्ये अपहरण झालेल्या मुली - १०२
२०२५ मध्ये अपहरण झालेल्या मुली - ७०
..............

तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया
- जवळच्या पोलिस ठाण्यात अथवा हेल्पलाइन १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधा.
- राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवा. यात पीडित आणि आरोपीची माहिती द्यावी लागते. हेल्पलाइन १४४९० यावर संपर्क साधू शकता.
- कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्यास तुमच्या संस्थेच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार करा.
- बाल लैंगिक अत्याचार झाल्यास तत्काळ चाइल्डलाइन (१०९८) किंवा पोलिसांना कळवा. बालकल्याण समितीला २४ तासांच्या आत कळवणे आवश्यक आहे. कायद्यानुसार बालकासाठी विशेष बालस्नेही प्रक्रिया वापरली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com